who is osho ओशो कोण आहेत?

Spread the love

who is osho ओशो कोण आहेत?

रजनीश (जन्म: चंद्र मोहन जैन; ११ डिसेंबर १९३१ – १९ जानेवारी १९९०), आचार्य रजनीश म्हणूनही ओळखले जाणारे, आणि सामान्यतः ओशो (हिंदी)म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय धर्मगुरू,तत्त्वज्ञ, गूढवादी आणि रजनीश चळवळीचे संस्थापक होते. ते त्यांच्या हयातीत एका वादग्रस्त नवीन धार्मिक चळवळीचे नेते होते. त्यांनी संस्थात्मक धर्मांना नाकारले,[५][१][६] आणि असा आग्रह धरला की आध्यात्मिक अनुभवाला कोणत्याही एका धार्मिक सिद्धांताच्या प्रणालीमध्ये संघटित केले जाऊ शकत नाही. एक गुरू म्हणून, त्यांनी ध्यानाचा पुरस्कार केला आणि डायनॅमिक मेडिटेशन नावाचे एक अद्वितीय स्वरूप शिकवले. पारंपरिक तपस्वी प्रथांना नाकारून, त्यांनी आपल्या अनुयायांना ऐहिक इच्छांपासून अलिप्त राहून जीवनाचा पूर्णपणे स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले.

जगात अध्यात्मिक गुरु म्हटलं की बहुतांश लोकांच्या डोळ्यांसमोर साधं जीवन, त्याग, विरक्ती आणि भौतिक सुखांपासून दूर असलेली व्यक्ती उभी राहते. पण या सगळ्या कल्पनांना पूर्णपणे छेद देणारा एक व्यक्ती होता —
Osho. ध्यान, आत्मशोध आणि मुक्त विचारसरणी यावर बोलणारा हा गुरु, एकाच वेळी ९३ Rolls-Royce गाड्यांचा मालक होता, ही गोष्ट आजही अनेकांना धक्का देणारी वाटते.
१९८० च्या दशकात अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात ‘राजनीशपूरम’ नावाचं एक मोठं आश्रमसदृश वसाहत उभारण्यात आली होती. इथे हजारो अनुयायी राहत होते.याच काळात ओशो यांच्याकडे हळूहळू Rolls-Royce गाड्यांचा ताफा जमा होत गेला.

ही एखादी-दोन नव्हे, तर तब्बल ९३ आलिशान Rolls-Royce
कार्स होत्या. विशेष म्हणजे या गाड्या त्यांनी स्वतःच्या पैशातून विकत घेतल्या नव्हत्या. त्यांच्या श्रीमंत अनुयायांनी, ट्रस्टमार्फत किंवा भेट स्वरूपात या गाड्या दिल्या होत्या.मग प्रश्न असा उभा राहतो की, अध्यात्म शिकवणाऱ्या व्यक्तीला इतक्या महागड्या गाड्यांची गरज काय? यावर ओशो यांचं उत्तर अत्यंत स्पष्ट आणि थेट होतं. ते म्हणायचे, “लोकांना ध्यान, शांतता, आत्मज्ञान यापेक्षा Rolls-Royceअधिक आकर्षित करते.” त्यांच्यामते, ही गाड्यांची संख्या म्हणजे केवळ श्रीमंतीचं प्रदर्शन नव्हतं, तर समाजाच्या मानसिकतेवरचा एक प्रयोग होता. लोक माझ्या ध्यानावर नाही, तर माझ्या गाड्यांवर चर्चा करतात, हेच या समाजाचं खरं सत्य आहे, असं ते सांगायचे.ओशो रोज सकाळी वेगवेगळ्या Rolls-Royce मधून आपल्या आश्रमात फेरफटका मारायचे. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले लोक केवळ त्या गाडीला पाहण्यासाठी थांबायचे. अनेकदा लोकांना गाडीचा रंग, मॉडेल आणि किंमत माहीत असायची, पण त्यांना ओशो काय बोलतात,काय शिकवतात, याची माहिती नसायची.

हीच विसंगती ओशो लोकांच्या समोर आणू पाहत होते.
त्यांचं तत्त्वज्ञान असं होतं की अध्यात्म म्हणजे गरिबी किंवा दुःख स्वीकारणं नाही. माणूस आतून मुक्त असेल, तर बाह्य संपत्ती त्याला गुलाम बनवत नाही.पैसा वाईट नाही, तर पैशाशी असलेली आसक्ती वाईट आहे. Rolls-Royce ही केवळ एक वस्तू आहे, ती मनावर राज्य करत नसेल, तर ती अडथळा ठरत नाही, असं त्यांचं ठाम मत होतं.

राजनीशपूरम प्रकरण, कायदेशीर अडचणी आणि वादांनंतर हा आश्रम बंद झाला. त्यानंतर या Rolls-Royce गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या गेल्या. आज त्या गाड्या जगभरातील संग्राहकांकडे विखुरलेल्या आहेत.पण या गाड्यांची कहाणी आजही लोकांना विचार करायला भाग पाडते.ओशो यांची ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावते —आपण खरंच अध्यात्म, विचार आणि मूल्यांकडे लक्ष देतो, की केवळ चमकदार गोष्टींनी आकर्षित होतो? Rolls-Royce गाड्या कालांतराने नष्ट होतील, पण त्या मागे उभा केलेला विचार आजही तितकाच अस्वस्थ करणारा आणि विचारप्रवर्तक आहे.

Leave a Comment